जॉन हॅरिस - लेख सूची

समाजाप्रति जबाबदेही

एकीकडे शासनव्यवस्था आणि दुसरीकडे घर-कुटुंबे, यांच्यामधले सामाजिक संघटनाचे क्षेत्र म्हणजे ‘नागर समाज’ किंवा अधिक सोप्या रूपात ‘एन्जीओ’ज. १९९०-२००० च्या दशकात हे क्षेत्र चांगल्या प्रशासनासाठी आवश्यक आहे, आणि ते शासनव्यवस्थेच्या बऱ्याच जबाबदाऱ्या घेऊ शकते, असे मत लोकप्रिय झाले. याला पार्श्वभूमी होती नव-उदारमतवादी संकल्पनांची. शासनव्यवस्था स्वभावतःच भक्षकवृत्तीची असते; प्रशासक नोकरशाही अपरिहार्यपणे (शासकीय) मालमत्तेचे ‘भाडे’ खाणारी असते; राजकारणी …